fungal infection treatment in marathi फंगल इन्फेक्शन: कारणे, लक्षणे, प्रकार, प्रतिबंध आणि उपचार

fungal infection treatment in marathi  फंगल इन्फेक्शन: कारणे, लक्षणे, प्रकार, प्रतिबंध आणि उपचार 

Table of Contents

  या लेखात मी तुम्हाला फंगल इन्फेक्शन काय आहे ? (What is Fungal Infection?) हे सांगणार आहे. त्याचबरोबर फंगल इन्फेक्शनचे प्रमुख प्रकार, लक्षणे आणि फंगल इन्फेक्शनवरील उपचारांबाबत (fungal infection treatment in marathi) माहिती देणार आहे.

फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) हा असा संसर्ग आहे जो संपूर्ण जगात आढळून येतो. जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एक विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते, तेव्हा ही समस्या उद्भवते.

फंगस (बुरशी) कुठेही असू शकते म्हणजे हवा, माती, पाणी आणि झाडांमध्येही. काही फंगस असे असतात की जे सामान्यपणे मानवी शरीरातही वास्तव करतात. इतर सूक्ष्मजंतूंप्रमाणे त्यातील काही आपल्यासाठी चांगले असतात तर काही वाईट नसते.

जेव्हा हानीकारक फंगस आपल्या शरीरावर हल्ला करतात, तेव्हा त्यांना संपवणे आपल्यासाठी खूप कठीण असते. कारण ते कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात आणि ते बरा होत असलेल्या व्यक्तीला वारंवार संक्रमित करण्याचा प्रयत्न करत राहतात.

फंगल इन्फेक्शनची लक्षणे (Symptoms Of Fungal Infection)

– त्वचेत बदल होणे 

– त्वचा लालसर होणे 

– खाज सुटणे 

हे फंगल इन्फेक्शनचे सामान्य लक्षणे आहेत. परंतु, फंगल इन्फेक्शनची लक्षणे समस्येच्या प्रकारावरही अवलंबून असतात.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार (Types Of Fungal Infection)

पुरुषांमध्ये फंगल इन्फेक्शनचे मुख्य रुपाने 3 सामान्य प्रकार पडतात.

1. पायात रिंगवर्मची समस्या (Athlete’s Foot) 

2. जांघांमध्ये खाज सुटणे (Joke Itch) 

3. रिंगवर्म (Ringworm) 

1. पायाच्या रिंगवर्मची समस्या (Athlete’s Foot)

पायावर होणाऱ्या रिंगवर्मच्या समस्येला ऍथलीट्स फूट किंवा टिनिया पेडिस (Tinea Pedis) असेही म्हटले जाते. हे सामान्य प्रकाराचे फंगल इन्फेक्शन आहे, ज्याचा पायावर परिणाम होतो. ऍथलीट फूटची समस्या सामान्यपणे अशा लोकांना उद्भवते, जे क्रीडा क्षेत्राशी निगडित असतात. अनेकवेळी ही समस्या दिवसभर बूट घालणाऱ्या लोकांनाही जाणवते.

हेही वाचाः उत्तम स्किन केअरसाठी 5 एशियन ब्यूटी सिक्रेट्स

पायाच्या रिंगवर्मच्या समस्येची लक्षणे (Symptoms Of Athlete’s Foot)

ज्यामध्ये,

– पायांना हवा लागू देणे 

– पाय कोरडे ठेवणे 

– स्वच्छतेची काळजी घेणे 

– आठवड्यातील काही दिवस सँडल घालणे

आदींचा समावेश आहे. 

2. जांघांमध्ये खाज सुटणे (Jock Itch)

फंगल इन्फेक्शन: कारणे, लक्षणे, प्रकार, प्रतिबंध आणि उपचार

फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) हा असा संसर्ग आहे जो संपूर्ण जगात आढळून येतो. जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एक विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते, तेव्हा ही समस्या उद्भवते.

फंगस (बुरशी) कुठेही असू शकते म्हणजे हवा, माती, पाणी आणि झाडांमध्येही. काही फंगस असे असतात की जे सामान्यपणे मानवी शरीरातही वास्तव करतात. इतर सूक्ष्मजंतूंप्रमाणे त्यातील काही आपल्यासाठी चांगले असतात तर काही वाईट.

जेव्हा हानीकारक फंगस आपल्या शरीरावर हल्ला करतात, तेव्हा त्यांना संपवणे आपल्यासाठी खूप कठीण असते. कारण ते कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात आणि ते बरा होत असलेल्या व्यक्तीला वारंवार संक्रमित करण्याचा प्रयत्न करत राहतात.

फंगल इन्फेक्शनची लक्षणे

– त्वचेत बदल होणे 

– त्वचा लालसर होणे 

– खाज सुटणे 

हे फंगल इन्फेक्शनचे सामान्य लक्षणे आहेत. परंतु, फंगल इन्फेक्शनची लक्षणे समस्येच्या प्रकारावरही अवलंबून असतात.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार (Types Of Fungal Infection)

पायाच्या रिंगवर्मची समस्या (Athletes Foot)

पायाच्या रिंगवर्मच्या समस्येची लक्षणे (Symptoms Of Athletes Foot)

ऍथलीट फूटचे निदान, उपचार आणि प्रतिबंध (Diagnosis, Treatment, And Prevention Of Athletes Foot)

जांघांमध्ये खाज सुटणे (Jock Itch)

जोक इचची लक्षणे (Symptoms Of Jock Itch)

जोक इचचे निदान, उपचार आणि प्रतिबंध (Diagnosis, Treatment, And Prevention Of Jock Itch)

रिंगवर्मची समस्या (Ringworm)

रिंगवर्मची लक्षणे (Symptoms Of Ringworm)

रिंगवर्मचे निदान, उपचार आणि प्रतिबंध (Diagnosis, Treatment, And Prevention Of Ringworm)

फंगल इन्फेक्शचे धोके (Risk Factors Of Fungal Infection)

सारांश (Conclusion)

पुरुषांमध्ये फंगल इन्फेक्शनचे मुख्य रुपाने 3 सामान्य प्रकार पडतात

1. पायात रिंगवर्मची समस्या (Athlete’s Foot) 

2. जांघांमध्ये खाज सुटणे (Joke Itch) 

3. रिंगवर्म (Ringworm) 

1. पायाच्या रिंगवर्मची समस्या (Athlete’s Foot)

पायावर होणाऱ्या रिंगवर्मच्या समस्येला ऍथलीट्स फूट किंवा टिनिया पेडिस (Tinea Pedis) असेही म्हटले जाते. हे सामान्य प्रकाराचे फंगल इन्फेक्शन आहे, ज्याचा पायावर परिणाम होतो. ऍथलीट फूटची समस्या सामान्यपणे अशा लोकांना उद्भवते, जे क्रीडा क्षेत्राशी निगडित असतात. अनेकवेळी ही समस्या दिवसभर बूट घालणाऱ्या लोकांनाही जाणवते

पायाच्या रिंगवर्मच्या समस्येची लक्षणे (Symptoms Of Athlete’s Foot)

सॉक्स आणि शूज, क्रीडा क्षेत्राशी निगडीत साधने आणि लॉकर रूम्ससारख्या ओलसर आणि उबदार वातावरणामध्ये ऍथलीट फूटची बुरशी वाढते. परंतु, वस्तुस्थिती ही आहे की, ऍथलीट फूटची समस्या कोणालाही उद्भवू शकते. उष्ण वातावरणातील ही सामान्य समस्या आहे. सामान्यपणे उन्हाळ्यात अनेकांना याची लागण होते. याचे जीवाणू उष्ण वातावरणात वेगाने वाढतात.

ऍथलीट फूटच्या समस्येची लक्षणे प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत

– प्रभावित भागात लाल डाग किंवा फोड येतात 

– त्वचेचा काही भाग मऊ पडतो. 

– त्वचेच्या काही भागांना चिरा पडतात. 

– त्वचेवरील कातडी गळून पडते, पापुद्रे निघतात. 

– पायात खाज सुटणे, जळजळ होणे किंवा वेदना जाणवतात. 

ऍथलीट फूटचे निदान, उपचार आणि प्रतिबंध (Diagnosis, Treatment, And Prevention Of Athlete’s Foot)

पायाला सुटणारी खाज ही खरं तर ऍथलीट फूटची समस्या नसते. साधारणपणे डॉक्टर असे इन्फेक्शन ओळखण्यासाठी त्वचेचा काही भाग खरडवून त्याचा छोटा तुकडा काढतात. त्यानंतर मायक्रोस्कोपने याची तपासणी करुन त्वचेवर एखादा फंगस आहे की नाही हे पाहतात.

असे अनेक प्रकारचे फंगस आहेत जे ऍथलीट फूटच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. त्वचेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक फंगस त्वचेवरील प्रभावाचा वेगळा प्रकार असू शकतो.

ऍथलीट फूटवरील उपचार त्वचेवर लावल्या जाणाऱ्या टॉपिकल क्रिम किंवा ऑइंटमेंटने केला जातो. ही क्रिम सामान्यतः मेडिकल स्टोअरवर सहजपणे मिळते. परंतु, गंभीर समस्या उद्भवल्यास तोंडावाटे घ्याव्या लागणाऱ्या औषधांचीही गरज भासते. बहुतांश प्रकरणात पायांच्या देखभालीसाठी काही सामान्य नियमांचे पालन करणे गरजेचे असते. ज्यामध्ये,

– पायांना हवा लागू देणे 

– पाय कोरडे ठेवणे 

– स्वच्छतेची काळजी घेणे 

– आठवड्यातील काही दिवस सँडल घालणे

आदींचा समावेश आहे. 

*2. जांघांमध्ये खाज सुटणे (Jock Itch)*

जांघांमध्ये खाज सुटण्याच्या समस्येला जोक इच किंवा टिनिया क्रूरिस (Tinea Cruris) असेही म्हटले जाते. हा फंगल इन्फेक्शन्सचा एक अत्यंत सामान्य प्रकार आहे. या फंगसला ओलसर आणि उबदार वातावरणात राहणे पसंत असते. त्यामुळे हा फंगस शरीराच्या अशा भागावर जास्त पसरतो, जिथे ओलसर आणि उबदारपणा मोठ्याप्रमाणात असतो. जसे,

– ग्रोइन (मांडीचा सांधा) 

– हिप्स 

– दोन जांघांमधील भाग 

– बगल 

आदी. 

*जोक इचची लक्षणे (Symptoms Of Jock Itch)

बहुतांशवेळा जोक इचची समस्या उन्हाळ्यात किंवा आर्द्रता असलेल्या शहरात मोठ्याप्रमाणात जाणवते. जोक इच मध्यम श्रेणीचा संसर्गजन्य आजार आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. म्हणजेच, जर आपण बाधित झालेल्या एखाद्या व्यक्तीशी थेट संपर्क साधला किंवा त्याने वापरलेल्या कपड्यांचा वापर केला तर आपल्यालाही ही समस्या येऊ शकते. हे फंगस महिला आणि पुरुषांच्या जननेंद्रियांलाही बाधित करु शकते.

जोक इच शरीरावर खाजेच्या स्वरुपात उद्भवतो. नेहमी हा गोलाकार लाल चकतीच्या रुपात दिसतो. जोक इचच्या लक्षणात खाली गोष्टींचा समावेश होतो.

– जननेंद्रिय, हिप्स आणि जांघेचा परिसर लालसर होणे. 

– खाज, जळजळ, वेदना, सूज किंवा बैचेन होणे. 

– गोल चकत्त्या पडणे, त्याच्या भोवती पुरळ येणे. 

– त्वचा फाटणे, पापुद्रे निघणे किंवा सूज येणे. 

जोक इचचे निदान, उपचार आणि प्रतिबंध (Diagnosis, Treatment, And Prevention Of Jock Itch)

जोक इचचे वेगळेपण लगेच समजते. डॉक्टर पाहताक्षणीच ते ओळखू शकतात. जर डॉक्टरांना पाहिल्यानंतर लक्षात आलं नाहीतर ते त्वचेचे सॅम्पल घेतात आणि त्याचा तपास करुन या आजाराला दुजोरा देतात.

जोक इच सामान्यपणे टॉपिकल औषधे आणि योग्य स्वच्छता राखून बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. जोक इचच्या बहुतांश प्रकरणात मेडिकलमध्ये मिळणाऱ्या औषधांनी बरा केला जाऊ शकतो.

तर काही गंभीर प्रकरणात डॉक्टरांना भेटून औषधे घेण्याचीही गरज भासू शकते. त्याचबरोबर त्वचेचा बाधित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेऊन फंगस संपवला जाऊ शकतो.

जोक इचपासून बचावासाठी नॅचरल फायबरने म्हणजे लिनन किंवा सुती कापडापासून बनविलेले सैल अंडरवियर घालण्यास सुरुवात करा. त्याचबरोबर जोक इचने संक्रमित असलेल्या लोकांच्या संपर्कात येणे टाळा. त्याचबरोबर अशा व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू जसे की, टॉवेल, चादर इत्यादींचा वापर टाळावा.

Leave a Comment