Holi information in Marathi: नमस्कार मित्रांनो, आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जगभरात होळी हा सण उत्साहाने आणि उमंगाने साजरा केला जातो, पण ते साजरा करण्यामागचा प्राचीन इतिहास किंवा शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती नसेल .होळी हा एक आनंदाचा सण आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की होळी केव्हा असते परंतु आपल्याला हे माहित आहे का? होळी का साजरे केली जाते म्हणूनच आम्ही आपल्यासाठी होळी विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगितले आहे. आज आपण होळी या सणाबद्दल माहिती अगदी सोप्या भाषेत माहिती पाहूया.
holi festival information in marathi
सण | होळी सणाविषयी माहिती |
होळी हा सण किती दिवस साजरा करतो | होळी हा सण परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात |
होळी म्हणजे काय | अति उत्साहाने आणि रंगाने खेळला जाणारा सण म्हणजे होळी |
होळीला विविध नावाने ओळखले जाते | पौर्णिमा, रंगपंचमी, शिमगा इत्यादी |
होळी कोणत्या महिन्यात असते | हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो |
होळी या सणाची संपूर्ण माहिती – Holi information In Marathi
होळी हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.भारत आणि नेपाळ या देशात होळी प्रामुख्याने साजरा केला जातो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस म्हणजे म्हणजे होळीचे दहनआणि दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी किंवा धुलीवंदन. कोकणात तसेच मराठवाड्यात होळीला ‘शिमगा’ या नावाने ओळखले जाते. होळी हे आपण नाव जरी ऐकले तरी आपल्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. होळी हा एक रंगाचा सण आहे. आणि होळी हे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत साजरी केली जाते. म्हणून या दिवशी सगळेजण खूप अगदी उत्साहात आणि आनंदात असतात होळीच्या दिवशी होळीचे दहन केलं जातं ज्याच्यात लाकडं गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौर्या ह्या टाकल्या जातात आणि होळीभोवती चकरा मारून आपल्या मनामध्ये असणारे वाईट विचार या होळीत जाळून टाकतात आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन दिवसाची सुरुवात करतात. होळी हा सण आपल्याला एकतेची तसेच बंधू भावाचे शिकवण देतो.
होळी हा सण साजरा करण्यामागचा प्राचीन इतिहास – Why we celebrate Holi ?
कोणताही सण साजरा करण्यामागे एक वैज्ञानिक कारण असते, तसेच होळी हा सण साजरा करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे, चला तर ते मग जाणून घेऊया .तुम्ही भक्त प्रल्हाद हे नाव ऐकलेच असेल .तो राजा हिरण्यकश्यप या राजाचा पुत्र होता .राजा हिरण्यकश्यप स्वतःला खूप बलवान समजायचा. तो अहंकारात बुडून देवी देवतांचा अपमान करायचा त्याला कोणत्याही देवी-देवतांचे नावे ऐकायला आवडायचे नाही, परंतु त्याचा पुत्र हा विष्णूभक्त होता हे त्याला अजिबात आवडायचे नाही तो वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून त्याला देवाच्या भक्तिन पासून दूर करण्याचा व तसेच घाबरवण्याचा प्रयत्न करायचा . त्याने खूप प्रयत्न करूनही त्याला याच्यात यश मिळाले नाही, परंतु भक्त प्रल्हाद ने विष्णूची उपासना करणे कधी सोडले नाही.त्याला भक्ती पासून दूर करण्यासाठी त्यांनी एक योजना बनवली, हिरण्यकश्यप राजाला एक बहीण होती तिचे नाव होलीका. तिला वरदान मिळाले होते की कोणत्याही प्रकारची आग तिची काहीही इजा करू शकणार नाही, राजांनी त्याच्या बहिणीला प्रल्हादला घेऊन आगीत बसण्यास सांगितले आणि भक्त प्रल्हाद हा आनंदाने होलीकासोबत अगीत बसला आणि विष्णूच्या नामस्मरणात मग्न झाला आणि समोरच्या काही क्षणातच होलीका जळायला लागली. नंतर तिला आठवण आले की जेव्हा ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून जाईल. अशाप्रकारे होलिका चा आगीत जळून नाश झाला. त्यामुळे या दिवशी राक्षसणीचा नाश झाला असे म्हणतात की मुलीच्या आगीत आपल्या मनातील द्वेष, वाईट विचार यांचा सुद्धा नाश होतो. या दिवशी भगवान विष्णू ने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस राजा हिरण्यकश्यप व होलिका पासून वाचवले होते.पूर्वीच्या होळी दहनानंतर उरलेले राग आणि पाणी किंवा तेल एकत्र करून अंगाला लावण्याची एक प्रथा होती.
हे पण वाचा :
- महाशिवरात्रीची माहिती मराठीमध्ये
- मराठी गोष्टी लहान मुलांसाठी
- आपल्या दैनंदिन जीवन
- होळी सणाची माहिती मराठी निबंध
- holi information in english
धुलीवंदन /रंगपंचमी म्हणजे काय ?
होळी दहन नंतरचा दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन होय. होळीला काही भागात धुळवड असेही संबोधले जाते. सृष्टीतील प्रत्येक गोष्टी पंचमहाभूतांपासून तयार होते त्यांना देखील मान वंदना देण्याचा दिवस म्हणजेच धुलीवंदन.
धुलीवंदन /रंगपंचमी खेळताना घ्यावयाची काळजी ?

- रंगपंचमी खेळायला जाण्या अगोदर तुम्ही मान, हात, पाय ,चेहरा आणि केसाला तेल लावा जेणेकरून तो तुम्हाला रंगातील हानिकारक रसायनापासून सुरक्षा करेल.
- आपण सर्वांनी रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंगाचा वापर केला पाहिजे कारण की रासायनिक रंग हे आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असते.
- काहींना तर रंगाची एलर्जी असते म्हणून त्यांना खूप मोठ्या प्रकारच्या रोगांना सुद्धा सामोरे जावा लागू शकतो.
- रासायनिक रंगामुळे विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतो.
- धुलीवंदन खेळताना सर्वात जास्त डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून रंग आपल्या डोळ्यात जाणार नाही आणि आपल्याला काही इजा पोहोचणार नाही.
- होळी खेळताना आपण आपले संपूर्ण शरीर झाकले गेले पाहिजे असे कपडे घातले पाहिजे. जेणेकरून आपली शरीर रंगांच्या जास्त संपर्कात येणार नाही.
Tags:
information about holi in marathi
information about holi in marathi
holi information in marathi 10 lines
holi information in marathi wikipedia
यावर्षी होळी कोणत्या तारखेला आहे ?
यावर्षी 6 मार्च 2023 ला होळी आणि 7 मार्च 2023 ला धुलीवंदन आहे
होळी हा सण कोण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ?
होळी असं प्रामुख्याने विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो पण असे काही राज्य आहे की ते होळीसाठी खूप प्रसिद्ध आहे जसे की राजस्थान ,हरियाणा, दिल्ली ,महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश.
होळी हा सण दुसऱ्या देशांमध्ये साजरा केला जातो का ?
होय. होळी हा सण भारत तसेच विविध देशांमध्ये साजरा केला जातो.
होळी ह्या सण का साजरा केला जातो ?
होळी असं वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये होळी असून प्रामुख्याने साजरा केला जातो.
खूपच छान माहिती दिलेली आहे…