बाल संगोपन योजना 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपल्या teamwrotes या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपले महाराष्ट्र सरकार बरेच योजना काढत असतात. आणि त्याचे लाभार्थी त्यांचे लाभ घेत असतात. मित्रांनो आज आपण अश्याच एक योजने विषयी नवीन updates घेऊन आलो आहेत ती म्हणजेच बाल संगोपन योजना 2023. ही योजना महाराष्ट्र सरकार 2005 पासून गरजू लोकांसाठी राबवत आहे. या योजने विषयी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा. या योजनेसाठी लाभार्थीना याचा नक्कीच लाभ घ्या.

बाल संगोपन योजना 2023 महाराष्ट्र शासनाची Official Website पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बाल संगोपन योजनेचा लाभ 60 हजार पेक्षा ही जास्त लाभार्थी लाभ घेत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का या योजने विषयी महत्वची माहिती बरेच लोकांनां माहिती नाहीये. त्यामुळे खूप लोक या योजने पासून वंचित आहेत.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा, अर्ज केल्यानंतर किती दिवसात लाभ मिळतो या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे.संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजनें अंतर्गत प्रत्येक गरजू लाभार्थीना दरमहा 2250 रु.मिळणार आहेत. आहे.अगोदर ही रक्कम 1100 रु. दरमहा मिळत होती, परंतु 31जानेवारी 2023 रोजी च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही रक्कम 2250 रु.दरमहा करण्यात आली आहे.

बाल संगोपन योजना 2023 महाराष्ट्र शासनाची Official GR PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता :-
1) या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) लाभार्थ्याचे वय 0 ते 18 वर्ष दरम्यान असावे.
3) अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे.
4) एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा
बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक आहेत.
1) या योजनेसाठी करावयाचा अर्जाचा नमुना ( कुठल्याही झेरॉक्स च्या दुकानात मिळून जाईल )
2) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट / जन्म दाखला
3) आधार कार्ड झेरॉक्स प्रत ( पालकांचे व बालकांचे )
4) तलाठी यांचा उत्पनाचा दाखला
5) पालकांचे मूत्यू नोंदणी प्रमाणपत्र (आई किंवा वडील मूत्यू दाखला )
6) पालकांचा रहिवाशी दाखला ( ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा )
7) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स
8) मुत्युचा अहवाल( पालकांना मूत्यू कशामुळे झाला ते उदा. कोविड ने झाला असेल तर मूत्यू अहवाल )