What can we do for the elderly? वृद्धांसाठी आपण काय करू शकतो | TeamWrotes

    What can we do for the elderly? वृद्धांसाठी आपण काय करू शकतो | TeamWrotes 

( कृपया दोन मिनिटं वेळ काढा पुढील लेख वाचा आणि आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा  आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत.)

    “वयोवृद्ध दापत्त्यांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले”… ही घटना आहे औरंगाबाद येथे  मामा चौक  पदमपुरा  येथील.. वर्तमानपत्रातली ही न्यूज वाचली आणि मन सुन्न होऊन गेले. श्री विजय मेहंदळे हे  वाल्मी  येथून   कनिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. एका उच्चशिक्षित  व्यक्तीचा  अशाप्रकारे झालेला अंत वाचून मन हेलावून गेलं. दहा-बारा दिवसापासून एका फ्लॅट मध्ये मृत्युमुखी पडलेले हे दोन जीव  जागेवरच कुजायला लागले आणि दुर्गंधी जेव्हा बाहेर पसरली  तेव्हा कुठे पोलिसांच्या मदतीने  हे सत्य उजेडात आलं.  घटना वाचून माझ्या  डोक्यामध्ये प्रश्नानं  थैमान घातलं…   

वृद्धांच्या समस्या प्रस्तावना

असे असंख्य वयोवृद्ध  प्रत्येक शहरांमध्ये  प्रत्येक गावांमध्ये एकाकी जीवन जगताना दिसतात यात चुक नेमकी कोणाची? काय म्हणावं या संस्कृतीला ? काय म्हणावं  या समाजाला? काय म्हणावं या शेजार्‍यांना? काय म्हणावं या नातेवाईकांना? काय म्हणावं उच्चविद्याविभूषित मुलांना? काय म्हणाव परदेशी स्थायिक झालेल्या मुलांना? काय म्हणावं अशा पालकांना ज्यांना वाटतं की आपल्या मुलांना आय  आय टी करून मोठ्यात मोठ्या आकड्याचा पॅकेज मिळवावं? यात चूक नेमकी कोणाची? समाजात घडणार्‍या अशा घटनांना जबाबदार कोण? मान्य आहे काळानुसार  सर्वच बदलत आहे.. पण म्हणून का नात्यातील ओलावा च नष्ट झाला आहे.. माणसातील माणुसकीच  हद्दपार झाली आहे.. कुठे लोप पावला माझा संकटसमयी धावून येणारा शेजारधर्म??.. कुठे नाहीशी झाली माझी एक  तीळ सात जण खाणारी भारतीय संस्कृती.. बातमी वाचून  माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं.. खरंतर प्रत्येकाच्याच मनाला चटका लावणारी  ही घटना आहे.. माझ्या  मनाला जसे प्रश्न पडले  तसेच प्रश्न तुमच्याही मनामध्ये आले का हो?? सापडतील का  आपल्याला आपल्याच मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं.. कराल का मला मदत  माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला..?

 •  आपल्या  मुलांनी मोठे पॅकेज मिळवाव परदेशी नोकरी करावी  असं कित्येक पालकांना वाटतं… यातच खरं सुख म्हणता येईल का? 
 • पैसा म्हणजे सुख असतं का? हे आपल्या पालकाचं कितपत योग्य आहे.? 
 • शेवटी  पैसाच सर्व काही असतो का? 
 •  उच्च विद्या विभूषित होऊन   जेव्हा  मुले नोकरी साठी परदेशी जातात आणि तिथेच स्थायिक होतात  अशा मुलांना गलेलठ्ठ पगाराच्या आकड्याला पुढे जन्मदात्या आई-वडिलांची काहीच किंमत का वाटत नाही? 
 • ज्या  आईन मरण यातना सोसून आपल्याला जन्माला घातलेला असतं जिच्यामुळे आपण  हे सुंदर जग बघू शकतो.. आणि ज्या बापाने  आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी  आयुष्यभर कष्ट उपसलेले असतात  अश्या  या दोन जिवापेक्षा  मुलांना पैसा  मोठा का वाटावा???.. 
 • पैसा जवळचा  का वाटतो आणि पैशाच्या मागे धावता-धावता  आपल्याला घडवणाऱ्या आपल्या वृद्ध माता-पित्यांचा त्यांना पूर्णतः विसर पडतो  यात चुक नेमकी कोणाची पालकांची का मुलांची?
 • जरी  मुलगा/मुलगी,  सून अथवा जावई सातासमुद्रापार  राहत असतील वर्षानुवर्ष जन्मदात्यांना भेटायला त्यांना वेळ नसेल तरी  24  तासा पैकी किमान पाच मिनिटाचा एक फोन करायला  त्यांच्याकडे खरंच वेळ नसतो का? 

 • माणूस खरंच एवढा बिझी असतो का???

  एकाकी  जीवन जगत असणाऱ्या  मातापित्यांच्या मुलांकडे/ मुलींकडे मातापित्यांच्या शेजारी राहणाऱ्या शेजारयांचे नंबर नसावेत का? जेव्हा आई-वडील फोन उचलत नाहीये तेव्हा मुलांचं कर्तव्य नाही का शेजार्यांना फोन करून आपल्या मातापित्यां बद्दल चौकशी करणे… अथवा एखाद्या नातेवाईकांना कळवणे…

 पैसा कमावण्याच्या नादात तुम्हाला आपल्या मातापित्यांना वेळ देता येत नसेल तर किमान  तुम्ही कमवत असणाऱ्या  पैशातून थोडाफार पैसा तुम्ही माता-पित्यांना साठी एखादा केअरटेकर ठेवून  त्याच्या पगारासाठी  खर्च करू शकत नाहीत का???

वृद्धावस्था म्हणजे काय

 • अंथरुणाला खीळलेल्या  व वयोवृद्ध झालेल्याव्यक्तीच्या घरात एकही कामवाली नसावी का??
 • भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आजच्या घडीला आपण काय पावले उचलली पाहिजेत.. याबद्दल आपलं  काय मत आहे?
 •  एकाकी जीवन जगत असणाऱ्या अशा वृद्ध दाम्पत्याच्या साठी आपण कोण  कोणत्या एनजीओची मदत घेऊ शकतो?
 • अशा वृद्धांसाठी सरकारी योजना द्वारे काय काय मदत मिळू शकते?
 • आज 35 ते 50 वयोगटातील आपण सर्वांनी काय योजना केल्या पाहिजेत?? जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही?

 अशा समस्यांचं निराकरण करणाऱ्या योजना आपल्या डोक्यात नक्कीच असतील तर कृपया   आपली मत कळवावीत..   आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत  आहोत..

People Also Asked 

we will cover in next articles

 • 1 minute speech on the elderly
 • Essay on caring for the elderly in 400 words
 • Short Essay on caring for the elderly
 • Essay on caring for the elderly in India
 • Caring for the elderly Essay in English
 • Paragraph on caring of elders
 • Elderly Essay introduction
 • The importance of caring for our elders Essay

Leave a Comment