Top 25 Good Thoughts in Marathi | TeamWrotes

 Top 25 Good Thoughts in Marathi | TeamWrotes 

आजचा सुविचार  25+
 1. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य? ‘मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे. ‘अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.
2. माझ्या एका मित्राला कोडी घालायची सवय आहे.मी त्याला पुष्कळदा सांगीतलंय की बाबा आयुष्याचं कोडं सुटत नाही, तुझं कोडं कुठुन सोडवु.त्याने एकदा तिन मुंग्यांच कोडं घातल….तिन मुंग्या अशा चालल्या होत्या, पहील्या मुंगीला विचारल तुझ्या मागे कीती मुंग्या आहे? ती म्हणाली दोन आहेत, दुसरी म्हणाली एक आणि तिसरी मुंगी म्हणाली पुष्कळ आहेत.. तर एकुण मुंग्या किती?बरं तो मित्र महत्वाचं काही तरी बोलत असतो. आपल्या मनात मुंग्या किती, मुंग्या किती चालुच. विचार करुन करुन डोक्याला मुंग्या येतात.मित्र जेव्हा निरोप घेतो तेव्हा त्याला मी म्हणतो कि बाबारे मुंग्या किती हे सांगुन जा..तो म्हणतो, काही नाही तिनच मुंग्या होत्या.’मग ती तिसरी मुंगी पुष्कळ मुंग्या आहेत असं का म्हणाली?'”ती खोटं बोलली.”

4. Marathi Suvichar 

प्रफ़ुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य . औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते .  
5.सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
6.जो उन्हातून वणवण फिरलाय तो सावलीतलं रहस्य ओळखतो. ज्यानं मरण जवळून पाहिलंय त्याला जीवन कळतं. ज्यांनी फक्त जीवनच पाहिलं आहे त्यांना झोप येत नाही.
7. “समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”
8.
 “भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.”
9. आजचा विचार 
झाडावरचं फूल म्हणजे आई-वडीलांच्या सान्निध्यात जगणारी मुलगी. खर्‍याखुर्‍या जीवनरसावर फुलणारी कळी, ती तोडली की संपलं. सासर फ्लॉवरपॉट सारखं असतं. तिथं मुलगी सजवली जातो. रूजवली जात नाही.
~ अभय राठोड | गुलमोहर

10. मराठी आजचा सुविचार संग्रह 

“काही स्वप्न लवकर संपतात, नाही का?” “पण झोप कायमची उडवतात.” “त्याला काय करणार? स्वप्न कुठ आपल्या मालकीची असतात?” “पण स्वप्नांच्या धास्तीन माणूस झोप थोडीच सोडतो? काही वेळ अंधाराकडे पाहतो आणि कुस बदलुन निद्रेची आराधना करतोच ना?”
11.
 
आजचा विचार
 वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मधे लुडबूड करत नाही. आपण त्याला वापरतो, पण तो स्वत:च अस्तीत्वही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो, तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही. तो तुम्हाला उध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात.
12.
आजचा सुविचार 
आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो … जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो… तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो… ओल्या मातीचा गंध… ‘देण्यात’ किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो… जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो… जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे… पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो… ‘ओझरता स्पर्श’… ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला … कारण त्यात ‘लालसा’ नसते… त्यात असते एक अनामिक ‘ओढ’… अन तीच आपल्याला टवटवीत ठेवते… अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो… तेंव्हा तेंव्हा राहतंच काय हो … तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो… बेधुंद ‘जगणं’ काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो..
13.
प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्ठा, पद ह्यामागे धावणारा माणूस फार केविलवाणा वाटतो.
14. 
मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसत. काही माणसे एकटी असतात अन् एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखी खारट असतात. पण ते जेव्हा दुसर्‍याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात व आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात. 
~ अभय राठोड 
15.
‘स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, ‘तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, ‘बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! ‘का?’ ‘बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’ 
16. 
ज्याच्या वृत्तीतच नम्रता आहे, ती व्यक्ती न बघता दृष्टीस पडते लक्ष न देता तिचं अस्तित्व जाणवत बोलणाऱ्यांच्या मैफलीत त्याचं मौन ऐकू येत आपल्या अस्तित्वाची जाणीव, खरतरं, अहंकारालाच करून द्यावी लागते
17. 
प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते. घराचं राज्य कोणीही चालवू शकतो. मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीच हवी असते.
18. प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
19. कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील ? केव्हातरी नि:शब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही. त्याला सीमा नाही. म्हणुनच आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद ‘मूक’ असतो. माणूस नि:शब्द होतो .
20. 
‘नावात काय आहे?’ – हा प्रश्न तसा जगजाहीर. नावात खरचं तसं काही नाही. ते नाव घेवुन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्व. तुम्हांला कोणते आईवडील लाभले त्यावर बरचसं अवलंबुन. तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही. पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजुतल्या एका ताटलीतल्या. दुसरी ताटली तुमची स्वत:ची. ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबुन.
21.
आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच, तो आहे परतफेडीची…!!!
22.
बाणेदार माणसालाच बाणॆदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं. अशा वेळी डोळ्यांतून येऊ पाहणार्‍या पाण्याला सांत्वन नको असतं. स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळही मान्य करावासा वाटत नाही, तेव्हा डोळ्यांतून येणारं पाणी पापणीच्या काठावरुन आत जिरवायचं असतं.
23. 
 
अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत.
24.
स्वतःचे आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते त्यालाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात.
25.
कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होणार आहे, अस प्रवासाच्या प्रारंभी समजत नाही आणि हमरस्त्यावर आलो कि पहिली पाऊलवाटही सापडत नाही.
 
 

Leave a Comment