Marathi Story चाफा फुलला… !!! मराठी कथा | TeamWrotes

 Marathi Story चाफा फुलला… !!! मराठी कथा | TeamWrotes 

चाफा फुलला.. !!!  एक सत्य गोष्ट 

     

माझ्यासोबत घडलेली एकदम मजेशीर  गोष्ट 

मला ती तारीख आठवतेय 22 डिसेंबर 2020, मंगळवार ! कॕम्प भागातील एका चर्चबाहेरच्या रस्त्यावर भिक्षेकरी तपासत होतो. या वारी कॅम्प मधल्या या चर्च बाहेर भीक मागणा-यांची खूप गर्दी असते. या गर्दीत मी ही मिसळून जातो.आजू बाजूला उंच उंच इमारती आहेत, छान छान घरं आहेत. घरांमध्ये माणसं असतात…

मला खूप काही कळायला लागले तेव्हा

घराबाहेर माणसं असतात, तशी ती फुटपाथवरही असतात…. ! यांच्याच जोडीला भटकी कुत्री, निराधार मांजरं, भुकेले ऊंदीर आणि थकलेली गाढवं सुद्धा असतात… निराधार माणसं आणि निराधार जनावरं मग फुटपाथवर एकरुप होवुन जातात…. इतकी कि माणुस कोणता आणि जनावर कोणतं हा फरक कळु नये !!!तर या दिवशी, रोजचे पेशंट रस्त्यावर तपासत असताना, गर्दीतून एक अस्पष्ट आवाज आला Excuse me sir, can I have your 2 minutes please ? मी आवाजाच्या रोखाने पाहिलं. एक सत्तरीची व्यक्ती माझ्या समोर उभी होती. डोळ्यात अश्रु, जोडलेले हात, विरळ झालेले विस्कटलेले पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, वाढलेली पांढरी दाढी, कपडे फाटलेले परंतु स्वच्छ, दोन्ही खांद्यामध्ये मोडकळीला आलेल्या दोन कुबड्या, पायाच्या पावला पासून गुडघ्या पर्यंत बांधलेल्या रंगीबेरंगी मळलेल्या पट्ट्या… !

खूपच वाईट अवस्था होती , खूप काही शिकायला मिळालं 

कसंबसं उभं राहण्याची धडपड करत ते हात जोडुन उभे होते, डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं… ! 

मी वर पासून खाली पायापर्यंत त्यांच्याकडे पाहिलं. नजर पायाकडे आल्यावर मला जाणवले, दोन्ही पाय अधू आहेत. त्यातील एका पायाच्या बांधलेल्या पट्ट्या मधून एक स्टीलचा रॉड बाहेर डोकावत होता, जिथून तो रॉड डोकावत होता तो भाग संपूर्णपणे रक्ताळलेला होता. 

मी चमकलो. आधी मला वाटलं, हा स्टीलचा रॉड त्यांनी पायाला आधारासाठी बांधला असावा. परंतु नीट बघितल्यावर कळलं, तो रॉड पायाच्या आतून कातडी फाडून बाहेर आलेला आहे. 

किती वेडणाशील होते ते बापरे!

बापरे किती वेदना असतील या बाबांना ? मी इतर पेशंटला सोडून त्यांच्या कडे वळलो. म्हणालो, ‘काय झालं आहे बाबा ?’ पालथ्या मुठीनं ते डोळे पुसत म्हणाले, ‘Sir, I am trying to meet you since very long…. इतकं बोलतांनाही त्यांना हुंदके आवरत नव्हते. मी उठुन जवळ गेलो, खांद्यांवर हात ठेवुन म्हणालो, ‘काय झालंय बाबा ? कसंबसं सावरत ते म्हणाले, ‘सर पिछले कई महिनोंसे मै आपको ढुंढ रहा हुँ… आप आज मिले…एव्हढं बोलुन पुन्हा ते हमसुन रडायला लागले, मला काहीच कळत नव्हतं…बाबांच्या एकूण संभाषणावरून ते मला भीक मागणारे वाटत नव्हते. त्यांचं काय काम असेल माझ्याकडे ? मी त्यांना थांबायला सांगितलं. सर्व पेशंट संपल्या नंतर मी त्यांना बाजूला घेऊन एका झाडाखाली रस्त्यावर मांडी घालून बसलो. बोलीये बाबा, आप क्युं ढुंढ रहे थे मुझे ?’रडता रडता, बाबा त्यांचं आयुष्य उलगडत गेले….…. हे बाबा मूळचे विशाखापट्टनम चे. वयाच्या दुसऱ्या वर्षी आई गेली आणि वयाच्या नवव्या वर्षी वडील गेले. इतर कोणतेही नातेवाईक नव्हते. समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश मिडीयम मधून घेतले. या पुढचं शिक्षण मात्र त्यांना घेता आला नाही. इलेक्ट्रिक च्या वायरींशी खेळणे हा त्यांचा छंद होता यातून ते हळूहळू इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्त करायला शिकले. स्वयंपाक करणे हा दुसरा छंद (कि गरज ?) या छंदाने त्यांना नोकरी दिली. वेग-वेगळ्या हॉटेल मधून त्यांनी कुक म्हणून नोकरी केली. मधल्या काळात लग्न केले. लग्नानंतर पत्नीला कॅन्सर झाला आणि ती सुद्धा काही कालावधीतच मुलं होण्याअगोदर गेली. आयुष्याच्या कोणत्याच टप्प्यांवर त्यांना साथ मिळाली नाही… ना आईबापाची, ना पत्नीची… मुलंबाळं तर झालीच नाहीत. बाबा आता सैरभैर झाले. तरीही वेगवेगळ्या हॉटेलमधून कुक म्हणून काम करत राहिले मिळतील तशी इलेक्ट्रिकची कामे करू लागले. 


यातून पैसा बऱ्यापैकी मिळत होता, पण मिळणारा पैसा एकाकीपण संपवु शकला नाही. जवळचं असं कोणीच नव्हतं. चांगल्यात चांगली नोकरी मिळविण्याच्या हेतूने त्यांनी अनेक ठिकाणी अनेक राज्यात कुक म्हणुन हाटेलात नोकऱ्या केल्या. असं करत करत महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी, एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून ते कामाला लागले. इथं त्यांनी भाड्याने घर घेतलं होतं. 2-3 लाख रुपये शिलकीला टाकले. 2017 साली, कामावरून परत येत असतांना, त्यांना एका मोटर गाडीने जोरात ठोकर दिली आणि त्यांचे दोन्ही पाय गुडघ्याच्या खाली मोडले. हॉटेल मालकाने तिथल्या एका हास्पिटलमध्ये दाखल केले. डाक्टरांनी बाबांच्या दोन्ही पायात स्टीलचे रा बसवले.  हाटेल मालकांनी काही खर्च केला, परंतु किचकट अशा या गंभीर दुखण्याचा खर्च वाढतच गेला. मालकांनी माघार घेतली. आता सर्व खर्चाची जबाबदारी बाबांची होती. वाढत्या खर्चाने बाबांच्या बँकेतील रक्कम संपत चालली. डाक्टरांनी त्यांना आणखी एक परेशन करायला सांगितले, पण तितके पैसे नसल्यामुळे, हे आपरेशन करताच ते दवाखान्याबाहेर आले. आता नोकरी सुटली, गोळ्या औषधं आणि खोलीच्या भाड्यानं शिल्लक रक्कम सुद्धा खावुन टाकली.

 यात एक – दिड वर्षं गेलं. कुणीतरी त्यांना सांगितले, चेन्नई येथे तुमचा इलाज मोफत होईल. मग उरलेले थोडेफार पैसे घेऊन, तुटलेल्या पायासह, कुबड्यांच्या आधाराने, चेन्नईला ट्रेनने ते कसेबसे पोचले. ती रात्र त्यांनी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर काढली. त्याच रात्री तीन-चार गुंडांनी येऊन त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील पिशव्या काढून घेतल्या. यात त्यांचे उरलेसुरले सर्व पैसे, आधारकार्ड, नकार्ड आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स चोरीला गेले. या मारहाणीत मोडलेल्या पायातून बसवलेले रॉड कातडी फाडुन बाहेर पडले.  या घटनेनंतर मोडलेल्या पायाबरोबरच आयुष्यं सुद्धा मोडुन पडलं. हे साल होतं 2019. नविन गाव… जवळ पैसा आणि कोणतंही कागदपत्रं नाहीत. बाबा सैरभैर झाले, वेड्यासारखे रस्त्यांवर फिरायला लागले. गुरुद्वाराच्या लंगरमध्ये कधी पोट भरायचे, कधी उपाशी रहायचे…अशातही त्यांनी नोकरी शोधली, पण मिळाली नाही. चालतांना पायातुन बाहेर आलेल्या राडला ते चिंध्या बांधुन आत ढकलायचे. सुई टोचली तरी किती त्रास होतो, आणि हे बाबा बाहेर आलेल्या राडला आत ढकलायचे… वेदनांची परिसीमा ! आयुष्याच्या डावात ते पुर्ण हरले.खरं सांगु… ? “जिंकणं हे मोरपीसासारखं हलकं असतं, त्याला झेलायला ताकद लागत नाही…. ताकद लागते ती “हरणं” झेलायला… ! हरण्याइतकं ओझं या जगात कशाचंच नाही, हे ओझं जो पेलेल तो खरा बलवान… ! बाबांनी हे हरणं पेललं, जवळ काहीही नसतांना…. ! निराधार अवस्थेत फिरत असतांना त्यांनी कुठेही याचना केली नाही. 

आता फेब्रुवारी 2020 उजाडला. अशात एके दिवशी लाकडाउन चा नारा सुरू झाला आणि तुम्ही महाराष्ट्रातून आला आहात तर महाराष्ट्रात परत जा म्हणून त्यांना एका बसने तेथील शासनाने परत पाठवले.मुंबईला जाणाऱ्या बसने ते पुण्यात उतरले. येथील ससून हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार होतील, हे ऐकून ते ससून हॉस्पिटल मध्ये गेले परंतु त्यांना तेथे तांत्रिक अडचणीमुळे दाखल करुन घेतले नाही.  आता पुढे काय ? हा विचार करत ते ससुन हास्पिटल समोरील फुटपाथवर पडुन राहिले. कोणताही आधार नव्हता… त्यांच्यासारख्याच फुटपाथवर निराधार पडलेल्या इतर लोकांच्या समवेत आता ते राहू लागले. अनेक संस्था इथे अन्नदान करत असतात. उपासमार थांबली, पण असं लाचारीनं जगणं त्यांना असह्य होत होतं. 


मी केलेली धडपड बघून रडू आले

नोकरी शोधण्याचा प्रयत्न चालुच होता, पण धडधाकट माणसाला नोकरी मिळण्याची मारामार तीथे पायानं अधु असलेल्या वृद्ध बाबांना कोण नोकरी देणार ? सुख तर तृप्तीची ढेकर देतच येत असतं, खरी कसोटी असते ती दुःख्खं पचवण्याची… ! ते हे दुःखं पचवायला शिकले… !भीक मागणाऱ्या लोकांपैकी त्यांना कोणीतरी माझे नाव सुचवले आणि तेव्हापासुन बाबांनी माझा शोध घ्यायला सुरुवात केली. लाकडाउन मध्ये रस्त्यांवर फिरायला बंदी, या डाक्टरला आता शोधायचं कुठं आणि कसं ? बरं इतकं करुन भेटलाच तर मदत करेलच याची खात्री काय ?  तरी एक प्रयत्न करु म्हणुन, भिक्षेकरी समाजाकडुन माझ्या येण्याच्या वार आणि ठिकाणांची त्यांनी माहिती घेतली. कडक लाकडाउन च्या काळात, कसेबसे लंगडत, लपत छपत ते, मी असेन त्या जागेवर मुश्किलीने पोचायचे, तीथं त्यांना कळायचं डाक्टर आब्बीच गया…. थोडा टायम पयले आते तो मिलते…डोळ्यातलं पाणी लपवत, आल्या वाटेनं ते माघारी फिरायचे, उद्या भेटतील डाक्टर या आशेवर ! आशा आणि निराशेचा हा लपंडाव किती वेदनादायी असेल याची नुसती कल्पना केलेलीच बरी ! हा लपंडाव तब्बल 6 महिने चालला आणि शेवटी 22 डिसेंबर 2020 रोजी मंगळवारी मला त्यांनी एका चर्चबाहेर गाठलं… !तोच हा दिवस… !!!  


माझ्या गोष्टीत झालेलं संघर्ष 


त्यांची सर्व कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. म्हणालो, ‘बाबा माझ्याकडुन होता होईल ती सर्व मदत करेन मी तुम्हांला.माझ्या या वाक्यानंतर बाबांचा बांध फुटला. इतके दिवस रोखुन धरलेल्या अश्रुंना त्यांनी वाट करुन दिली. डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना… खरंय, नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवायला आपलंच कुणीतरी लागतं… ! नियतीनं मला या निराधार बाबांचा “आपलं” व्हायला लावलं… ! यानंतर त्वरीत मी त्यांना पुण्यातील नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सागर राणे यांच्या पिंपळे गुरव येथील श्री समर्थ हॉस्पिटल येथे अडमिट केलं. डॉक्टर सागर राणे यांच्या निष्णात हातुन बाबांचे मोठे ऑपरेशन झाले. तारीख होती 1 जानेवारी 2021. क्सीडेंट नंतर बरोब्बर तीन वर्षांनी आज बाबांना योग्य ती ट्रिटमेंट मिळाली. बापरे, हे बाबा तीन वर्षे हा त्रास सहन करत होते. सारं अडलं होतं पैशावाचुन… बाबांना दुरचे नातेवाईक असतीलही, मित्रही बरेच असतील…पण त्यांच्या अडचणीच्या काळात कुणीही साथ दिली नाही.  पैशाचं “वजन” महत्वाचं वाटु लागला..    



   गोष्ट आवडल्यास नक्की comment करा.

1 thought on “Marathi Story चाफा फुलला… !!! मराठी कथा | TeamWrotes”

Leave a Comment