Manavta Hach Khara Dharma Marathi katha मानवता हाच खरा धर्म मराठी कथा | TeamWrotes

 Manavta Hach Khara Dharma Marathi katha मानवता हाच खरा धर्म मराठी कथा | TeamWrotes 

    

एक सुंदर कथा खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो…घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच! आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले…घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन…आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन…जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही. मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता? खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले.

  

बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग; राग त्रासापेक्षा जास्त होता…रागातच पुढे चाललो…पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले…रस्त्यावर पाणी सांडलेले होते.उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता….तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो. पण दुर्दैव.. तासभर एकही एस.टी.नव्हती…मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू…पाकिट उघडले त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले…अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे. दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली– 

मानवता हाच खरा धर्म निबंध मराठी | Manavta Hach Khara Dharma Nibandh.   

    आज आपण मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध बघणार आहोत. सानेगुरुजी म्हणतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।’ माणसाने माणसाशी माणसारखे वागणे, त्याच्यावर प्रेम करणे हाच मानवाचा खरा धर्म. प्रत्येकाने हा धर्म पाळला पाहिजे. असा त्याचा अर्थ आहे. ते खर तर बरोबरच आहे.

   ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते…त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते… असे लिहले होते. अरे चांगले बूट?? परंतु त्यांचे बूट तर फाटलेत…आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या…पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट…मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही… मी… मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून. एक तीसरी चिठ्ठी मिळाली. जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा…आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या…पप्पांची गाड़ी…आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो…आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता…

    मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती… मी समजलो पप्पा कुठे आहेत! पप्पा तिथेच होते…मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला…नको पप्पा नको.. मला नाही पाहिजे मोटर सायकल…बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या…आणि हो पप्पा, आता मला मोठा माणुस व्हायचच आहे…तो पण तुमच्यासारखाच..

     .पप्पा फक्त तुमच्या सारखाच…पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली…सगळं शांत वातावरण…मित्रांनो;आई-वडिलांना ओळखा. आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही…खऱ्या अर्थाने जगा…हेच तर खरं जिवन आहे…आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या…माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा…      

            Credit Goes To Writer .——Abhay Rathod 

Leave a Comment