तारे आणि आपली सूर्यमाला | TeamWrotes

तारे आणि आपली सूर्यमाला / Stars and our solar systems/ 

Solar system in marathi information

  नमस्कार मित्रांनो, आपल्या परीक्षेत नेहमीच या धड्यवर प्रश्न पडतोच, म्हणून आम्ही या वर पडणारे प्रश्न सहित Concept सुध्धा घेतले आहेत.

     

तारे कशाला म्हणतात समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत 

   सूर्य हा एक तारा असून त्याच्या भोवती पृथ्वीसहित आठ नीरनिराळे ग्रह वेगवेगळ्या कक्षेत परीभ्रमण करतात.

सूर्य कोणत्या दिशेला उगवतो

  तसे प्रामुख्याने चार दिशा आहेत , सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो व पश्चिमेला माळवतो.

चंद्र : चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.  तो पृथ्वी भोवती भ्रमण करतो म्हणून त्यास पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. चंद्र पृथ्विपासून सरासरी 3,84,400 किमी एवढ्या अंतरावर आहे. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमन करत असताना स्वतः&nbsp भोवतीही फिरत असतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमन करण्यास 27.3 दिवस लागतात. आपण चंद्राची केवळ एकच बाजू पाहू शकतो . 

तारकासमूह:- आपल्याला आकाशात अनेक तारका समूह दिसतात. उन्हाळ्यात रात्री आकाशात सात तार्‍यांचा समूह दिसतो त्यास सप्तर्षि असे म्हणतात. मृग नक्षत्र हा आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7-8 तारे दिसतात. त्यापैकि चार तारे एका चौकोनाचे चार बिन्दु असतात. या तारकासमुहाच्या काही अंतरावर व्याध तारा दिसतो. मृघ नक्षत्राच्या मधल्या तीन तार्‍यापासून एक सरळ रेषा काढली असता हे एक रेषा तेजस्वी तार्‍याला जाऊन भेटते. तो तारा म्हणजे व्याध होय. 

                                       

वृश्चिक तारका समूह :— वृश्चिक तारकासमूहात 10 ते 12 तारकासमूह दिसतात. त्यातील ज्यष्ठ तारा हा सर्वात तेजस्वी तारा असतो. वृश्चिक तारकासमूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषूवृत्ता च्या आकाशात दिसतो. आकाशात एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर गोलार्ध्याच्या आकाशात, तर 51 तारकासमूह दक्षिण गोलार्ध्याच्या आकाशात आहेत. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्राची कल्पना केली होती. 

सूर्यमाला :–

सूर्य त्या भोवती परिभ्रमन करणारे 8 ग्रह, त्यांचे चंद्र, लघुग्रह, धूमकेतू या सगळ्यांना मिळून सूर्यमाला असे म्हणतात. 

सूर्य :–

आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे.त्याच्या पृष्टभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस आहे. सूर्याचा आकारा एवढा मोठा आहे की त्यात आपल्या पृथ्वी सारख्या 13 लाख पृथ्वी माऊ शकतात. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात. 

ग्रह :-

सूर्या भोवती बुध, शुक्र, पृथ्वी मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेपच्युन असे एकूण आठ ग्रह वेगवेगळ्या कक्षेत परिभ्रमन करतात. ग्रहाला सूर्याभोवती एकफेरी पूर्ण करण्यास जो कालावधी लागतो त्यास त्या ग्रहाचा परिभ्रमन काल असे म्हणतात. 

प्ल्युटो :-

2006 पर्यन्त प्ल्युटो  या दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत नवव्या ग्रहाचे स्थान होते. पण अंतराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमन कक्षेच्या नियमात प्ल्युटो  चे परिभ्रमन ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही. प्ल्युटो आणि त्याच्या सारख्या इतर ख्गोलिय घटकांना बटूग्रह म्हणून ओळखले जाते. 

ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो का ?

परिभ्रमन काळ:-

प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमन काळ हा वेगवेगळा असतो. सूर्यापासुन जसे जसे दूर जावे तसे तसे परिभ्रमन काळ वाढत जातो. बुधाचा परिभ्रमन काळ केवळ 88 दिवस आहे.  तर नेपच्यून चा परिभ्रमन काळ 165 वर्षे एवढा आहे. सूर्याभोवती परिभ्रमन करता करता ग्रह स्वतः भोवती फिरतात त्यास परिवलन असे म्हणतात. काही ग्रहाभोवती काही खगोलीय वस्तु परिभ्रमन करतात म्हणून अशा खगोलीय वस्तूस त्या ग्रहाचे उपग्रह असे म्हणतात. पृथ्वीला एक उपग्रह आहे. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत तर शनि या ग्रहास तब्बल 60 उपग्रह आहेत. 

बुध :–

बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि सर्वात छोटा ग्रह आहे. तो सूर्याच्या अतिशय जवळ असल्याने त्यास पृथ्वीवरून पाहणे सोपे नसते पण सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी त्याला क्षितिज समांतर पाहता येते. बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही.

शुक्र :-

पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र होय. शुक्र या ग्रहाला पाहट तारा असेही म्हणतात. तो पहाटे किंवा संध्याकाळी अत्यंत तेजस्वी दिसतो. शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. सूर्य हा स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वे कडे फिरतो. चंद्राच्या जशा कला असतात तशा शुक्राच्याही कला असतात.

पृथ्वी :–

सूर्यमालेतील एकूण ग्रहापैकी केवळ पृथ्वी असा ग्रह आहे जेथे जीवसृष्टि आढळते.

मंगळ :-

मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तेथील मातीत लोह असल्याने तो ग्रह लालसर दिसतो. म्हणून त्यास लालग्रह असेही म्हणतात. मंगळ या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

आकाशगंगा :

 •  सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.
 • चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 •  प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.
 • · चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.
 • · एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.
 • · एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.
 •  प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.
 • · प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.
 • · बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.
 • · बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 
 • · पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला ‘पहाटतारा’ म्हणतात.
 • · पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना ‘अंतर्ग्रह’, तर कक्षेबाहेरील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हणतात.
 • · ‘मंगळ’ हा पहिला बाह्यग्रह आहे.
 • · सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरु’
 • · गुरूला एकूण 79 उपग्रह आहेत.

· शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

· शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

· धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

· हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

· भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

· त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना – 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

· ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

· GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

· टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

· आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

· जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

Planets information in marathi

चुंबकत्व :

· 5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

· चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

· मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

Leave a Comment