महाराष्ट्राचा भूगोल (Geography Of Maharashtra) संपूर्ण माहिती -Teamwrotes

 महाराष्ट्राचा भूगोल (Geography Of Maharashtra) संपूर्ण माहिती 2023 -Teamwrotes

✅ महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.की.मी. 
असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी महाराष्ट्राने 9.36 टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे.
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे.
महाराष्ट्रचा अक्षय वृत्तीय विस्तार 150 उत्तर ते 2201 असा आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 7206 पूर्व ते 8009 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे.
🌷1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या 26 होती जी नंतर वाढून 36 झाली आहे.
म्हणजेच सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत.
महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत.
महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे.
महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. 
मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सांगली-मिराज-कुपवाड, नांदेड-वाघाळा, आकोला, मालेगाव, भिवंडी-निजामपुर, मीरा-भाईंदर, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई-विरार, लातूर, चंद्रपुर, परभणी
🌷महाराष्ट्रास 720 की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
🌷महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार 800 की.मी. आहे.
🌷राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे.  

✅ महाराष्ट्र राज्य सीमा :

🌷पश्चिमेस अरबी समुद्र
🌷वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली 
🌷केंद्रशासित प्रदेस
🌷उत्तरेस मध्येप्रदेश
🌷पूर्व व ईशान्येस छत्तीसगढ
🌷दक्षिणेस गोवा व कर्नाटक
🌷आग्नेयेस तेलंगणा

✅ महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे :

☄कर्नाटक —-नांदेड, लातूर, उस्मानाबाद, 
☄सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सुंधुदुर्ग
☄गोवा——–सिंधुदुर्ग
☄मध्येप्रदेश —गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार
☄छत्तीसगढ—-गडचिरोली, गोंदिया
☄तेलंगणा —–गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
☄गुजरात ——धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर

✅ महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती :

💥सिंधुदुर्ग————–1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
☄जालना—————1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
☄लातूर—————-16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
☄गडचिरोली————26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
☄मुंबई उपनगर———1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
☄वाशिम————–1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
☄नंदुरबार————-1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
☄हिंगोली————-1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
☄गोंदिया————–1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
☄पालघर————–2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन

Leave a Comment